संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त दुसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन
पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०७/२०२४ – संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त दुसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन, पैठणचे संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ. संदीप सांगळे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
प्र कुलगुरू डॉ.पराग काळकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या हस्ते हा सत्कार होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक माजी अध्यक्ष भारत सासणे 95 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन उदगीर तर प्रमुख पाहुणे म्हणून राम सर्वगोड साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, कायदे अभ्यासक संत चोखामेळा महाराज वंशज पंढरपूर,संत साहित्याचे अभ्यासक डॉ.ओम श्रीश श्री दत्तोपासक यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, सावरकर सभागृह कर्वे रोड,पुणे येथे दि. व वेळ : मंगळवार, 23 जुलै सायं. 5:00 वा.
येथे संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन या कार्यक्रमाचे निमंत्रक ह.भ.प.प्रसाद महाराज माटे, डॉ. जयवंत अवघडे, प्रा.अलका सपकाळ, धोंडप्पा नंदे,श्रीमती ए.डी.राऊत, हरीश भोसले संत चोखामेळा अध्यासन केंद्र वृंदावन फाऊंडेशन,पुणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
संपर्कासाठी – 9860499272