उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या गैरहजेरीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले नाराज ?
मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज –पीपल्स एज्युकेशन सोसायटी च्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना निमंत्रित केले होते.मात्र ना.रामदास आठवले यांचे निमंत्रण स्वीकारूनसुद्धा या कार्यक्रमास चंद्रकांत दादा पाटील अनुपस्थित राहिले त्याबद्दल ना.रामदास आठवले यांनी स्टेजवरच तीव्र नाराजी व्यक्त केली.
त्यानंतर अफवा पसरली की आठवले यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दांडी मारुन चंद्रकांत दादा पाटील आनंदराज आंबेडकर यांनी आयोजित केलेय पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमास उपस्थित राहिले. ती अफवा ऐकून रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली.चंद्रकांत दादांनी मैत्रिधर्म युतिधर्म मोडला असल्याची नाराजी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
मात्र नंतर अधिकृत माहिती अशी मिळाली की चंद्रकांतदादा पाटील आंनद राज आंबेडकर यांच्याही कार्यक्रमाला गेलेच नाहीत.ते उपस्थित राहणार होते मात्र आनंद राज आंबेडकर यांच्या कार्यक्रमालाही चंद्रकांतदादांनी दांडी मारली.