सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डी एस गायकवाड सेवानिवृत्तीनिमित्त तिसंगी सोनके ग्रामस्थांच्यावतीने सत्कार
सोनके ता.पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- डी एस गायकवाड सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना तिसंगी सोनके हे नुकतेच सेवानिवृत्त झाले.त्यांच्या काळात लंपी च्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे अनेक जनावरं लंपीग्रस्त झाली होती . पशुपालक हा लंपी आजाराने घाबरून गेला होता.अशा काळात लंपी आजार मोठ्या प्रमाणात आटोक्यात आणून पशुधन वाचविण्यासाठी डी एस गायकवाड सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांच्याकडून मोठे प्रयत्न केले गेल्याने पशुधनाच नुकसान टळले होते कारण लंपीचे निदान योग्य वेळी करण्यात आल्याने हानी टळली.तसेच लंपीग्रस्त जनावरांच्या मालकांना शासकीय मदत मोठ्या प्रमाणात डी एस गायकवाड सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांनी मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
31 मे शासकीय नियमानुसार डी एस गायकवाड सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांची सेवानिवृत्ती झाली त्यामुळे त्यांचा तिसंगी सोनके ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. सुधाकर माणिक खरात,सत्यवान काशिनाथ मस्के, डॉ.अतुल बोरकर,डॉ. राहुल सपकाळ यांचेसह सर्व मान्यवरांनी डी एस गायकवाड सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांचा सत्कार केला.
सत्काराला उत्तर देताना डी एस गायकवाड सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांनी तिसंगी सोनके ग्रामस्थांनी सेवाकाळात केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुधाकर खरात यांनी केले.