सोलापूर —- modern farmaclogy (सी.सी.एम.पी) certificate course केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मधील नोंदणी प्रक्रिये संदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयांच्या निषेधार्थ होमिओपॅथिक डॉक्टर तर्फे १६जुलै रोजी उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र होमिओपॅथिक कौन्सिल चे सध्याचे प्रशासक डॉ बाहुबली शहा हे आझाद मैदान मुंबई येथे उपोषण करून करणार आहेत.त्यामध्ये महाराष्ट्रतील तमाम होमिओपॅथिक डॉक्टर आंदोलनात सहभागी होणार आहेत.असे सोलापूर होमिओपॅथिक संघटना संस्थापक अध्यक्ष डॉ सुनील वरळे यांनी सांगितले
तसेच सोलापूर शहर व जिल्ह्यातुन सुमारे जवळजवळ एक ते दिड हजार होमिओपॅथिक डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.आजपासुन तीन दिवस दवाखाना बंद ठेवुन निषेध नोंदविणार आहेत. कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टर ची नोंदणी करण्यात येणार होती मात्र या नोंदणीला IMA संघटनेने विरोध केला.या विरोधाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येणार आहे असे डॉ सुनील वरळे म्हणाले.
