बारामती:- शुक्रवार दिनांक 11 जुलै 2025 रोजी वसंतनगर, बारामती येथे बारामती दौंड इंदापूर तालुक्यातील ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या प्रसंगी ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊतसाहेब यांनी सांगितले की आपल्या मिनिमम पेन्शनचे 99 टक्के काम झाले असून 21 जुलै रोजी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे यामध्ये पेन्शनवाढी बाबतचा विषय असून 31 जुलै पर्यंत मिनिमम पेन्शनचे काम करा अन्यथा 4 व 5 ऑगस्ट 2025 रोजी जंतर मंतर ,दिल्ली येथे आंदोलन करण्यात येईल. हा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. त्यांचे म्हणणेनुसार माननीय मंत्री महोदयांची झालेल्या चर्चेनुसार आपले मिनिमम पेन्शनचे शंभर टक्के काम होणार आहे.
