मुंबई- मंत्रालयातील अधिकारी तथा अनुसूचित जाती/ जमाती/ वि.जा.भ.ज/ इ.मा.व./ वि.मा.प्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेने व मंत्रालयातील इतर विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबईचे उपसचिव मो.बा. ताशिलदार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला .
मो.बा. ताशिलदार हे शालेय शिक्षक विभाग मंत्रालय मुंबई येथे उपसचिव या पदावर कार्यरत आहेत. ते कर्तव्यदक्ष, कार्यशील व मनमिळाऊ अधिकारी अशी त्यांची ओळख असल्यामुळे मंत्रालयात फार मोठा मित्रपरिवार त्यांचा चाहता आहे. व त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाचे कार्यशीलतेचे प्रतिक आज त्यांच्या वाढदिवशी दिसून आले. ताशिलदार यांचा दि. २४ जून रोजी वाढदिवस होता. मंत्रालयात व महत्त्वाच्या शालेय शिक्षण विभागात उपसचिव पदावर कार्यरत असल्यामूळे सकाळपासून वरिष्ठांकडे वेगवेगळ्या मिटींगला त्यांच्या चालू होत्या. ते दुपारपर्यंत कामात व्यस्त होते. तर इकडे त्यांचे मित्र मंडळ वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास त्यांच्या निजी कक्षाकडे चकरा मारत होते. मीटिंग संपल्यावर ताशिलदार त्यांच्या निधी कक्षात आल्यावर मंत्रालयातील अधिकारी संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे व त्यांच्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. त्यांचे सोबत वाल्मीक वानखेडे, दिनेश अहिरे, दर्शन अहिरे, हरिभाऊ निकम, नांदेडचे AR News Network चे चॅनलचे मराठवाडा विभाग प्रमुख सखाराम कुलकर्णी, उपसचिव अंबादास चंदनशिवे, उपसचिव संतोष कराड, शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव अमोल मुंडे ,किशोर गुडेकर आदींनी ताशिलदार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची गर्दी होऊन त्यांचेवर शुभेच्छाचा वर्षाव होत होता.
