जुलमी फिटनेस विलंब प्रति दिवस 50/- रूपये दंड तात्काळ वाहन पोर्टलवरून हटवण्यात यावे
सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज –15 वर्षाच्या आतील वाहनांस / ऑटोरिक्षास लादण्यात आलेले जुलमी फिटनेस विलंब प्रति दिवस 50/- रूपये दंड तात्काळ वाहन पोर्टलवरून हटवण्यात यावेत या मागणीवर ऑटोरिक्षा संघटना संयुक्त महासंघाची भूमिका ठाम असून जर 50/- रु फिटनेस विलंब शुल्क हा जाचक कायदा रद्द केला नाही तर प्रत्येक जिल्ह्यात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासोबत मुंबई येथे झालेल्या बैठकीत संयुक्त महासंघाच्यावतीने देण्यात आला.

हे निवेदन देतेवेळी ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष महेश चौगुले, महासचिव मच्छिंद्र कांबळे, कार्याध्यक्ष श्री वानखेडे ,सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतिश शिंदे, जिल्हा संघटक पाटील महासंघाचे जिल्हाध्यक्ष विशाल लोंढे आदी पदाधिकारी उपस्थित होते.