मोबाईलवर आलेले स्त्रीचे फोटो कोणाचे अशी विचारणा केल्याने पतीची पत्नीस बेदम मारहाण
पतीविरूध्द केला गुन्हा दाखल
मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- खुपसंगी येथे एका 29 वर्षीय पत्नीने आपल्या पतीला तुमच्या मोबाईलवर महिलेचे व दोन मुलीचे आलेले फोटो कोणाचे आहेत असे विचारल्याच्या कारणावरून पतीने पत्नीस शिवीगाळ करीत वेळूच्या काठीने पाठीवर व डोकीवर मारहाण करून गंभीर जखमी केल्या प्रकरणी पती संभाजी लक्ष्मण लवटे याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहितीप्रमाणे यातील पत्नी फिर्यादी हि दि.26 रोजी सकाळी 7.30 वा.घरकाम करीत असताना आरोपी तथा पती यांच्या मोबाईल व्हॅटसअपवर राहुल कसबे याने एका महिलेचा व दोन मुलीचे फोटो पाठविले होते. ते फोटो फिर्यादीने बघितल्यानंतर हे फोटो कोणाचे आहेत अशी विचारणा केली असता आरोपी पतीने शिवीगाळ करून तेथेच पडलेल्या वेळूच्या काठीने पाठीवर मारहाण केली.यावेळी सासूने हातातील काठी हिसकावून घेतल्यानंतर पतीने जवळच पडलेला विटेचा तुकडा घेवून डोक्यात मारून गंभीर जखमी केले.त्यामुळे डोक्यातून रक्त येवू लागले.
मारहाण केल्याचे कोणास सांगितले तर तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी देवून तो कामावर निघून गेल्याचे पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.घटनेनंतर फिर्यादीची आई व मेव्हणा यांनी तिला पोलिस ठाण्यास घेवून आल्यानंतर उपचाराकरीता पोलिसांनी यादी दिल्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून तक्रार दाखल केली असल्याचे म्हटले आहे.