रायरेश्वर येथे हिंदवी स्वराज्य संकल्प दिन होणार साजरा

रायरेश्वर ता.भोर जि.पुणे येथे हिंदवी स्वराज्य संकल्प दिन ४ एप्रिल २०२५ रोजी होणार साजरा

भोर ता.भोर जि.पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४५ साली हिंदवी स्वराज्याची रक्ताचा अभिषेक घालुन शपथ घेतली तो दिवस म्हणजेच हिंदवी स्वराज्य संकल्प दिन.दरवर्षी उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.यावर्षी चैत्र शुद्ध सप्तमी ४ एप्रिल २०२५ रोजी हा उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या उत्सव सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे-
दिनांक ३ एप्रिल २०२५ वार गुरुवार..सायंकाळ ८:०० वाजता दिपोत्सव,रात्री ९:०० वाजता महाप्रसाद,रात्री १०:०० वाजता मंदीर सजावट,रात्री ११:०० ते पहाटे १:०० जागरण गोंधळ,

दिनांक ४ एप्रिल वार गुरुवार सकाळी पहाटे ६:०० वाजता शिवालय मंदिरामध्ये रायरेश्वरास अभिषेक होम हवन,सकाळी ९:०० वाजता ध्वजपूजन, सकाळी १०:०० पालखी सोहळा, सकाळी ११:०० वाजता शिवव्याख्यान,दुपारी १२:००वाजता मान्यवर सन्मान व पुरस्कार सोहळा,दुपारी १:०० वाजता महाप्रसाद,दुपारी २:३० वाजता कार्यक्रम समाप्ती,दुपारी ३:०० वाजता गड साफसफाई करण्यात येणार आहे तरी शिवशंभु भक्तांनी या पवित्र सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन स्वराज्यभूमी प्रतिष्ठाणच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top