यांचा वाढदिवस दुसर्यांसाठी जीवघेणा ठरू नये ही नगरपालिकेला आग्रही विनंती
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,१९/०३/२०२५- वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे करणे ही एक फॅशन झाली आहे.ज्या कार्यकर्त्याने जास्त डिजिटल लावली तो त्या नेत्या जवळचा असा गोड गैरसमज झाला आहे. मात्र हा शुभेच्छा संदेश देताना तो दुसर्यांसाठी जीवघेणा ठरू नये एवढी अपेक्षा निश्चितपणे हवी.

पंढरपूरातही अशीच डिजिटल ची चढाओढ असते.रस्ता दुभाजकांवर लावलेले हे शुभेच्छा फलक अनेकवेळा अपघातांना कारणीभूत ठरत आहेत.अशाच एका फलकाचे फोटो टाकले आहेत.तो फलक गोल फिरत असून वाहन चालकांना धोकादायक ठरत आहे.

हा फलक महत्वाच्या आणि जास्त रहदारीच्या जुन्या कराड नाक्याजवळील आहे. वाढदिवसाचे कौतुक किती दिवस करायचे किंवा लावलेले फलक किती दिवस ठेवायचे याचे काही नियोजन नगर पालिकेने करणे गरजेचे आहे.यासाठी नगरपालिकेने कडक धोरण अवलंबणे गरजेचे आहे.कारण कोणाच्याही जीवाला धोका होण्याअगोदर सर्व फलक काढणे गरजेचे आहे.
