इर्जिकच्या प्रदेश उपाध्यक्षपदी आटपाडीचे सादिक खाटीक – नारायण सुमंत यांनी केली नियुक्ती
आटपाडी/ज्ञानप्रववाह न्यूज,दि.१७- शेतकरी साहित्य इर्जिक (परिषद ) महाराष्ट्र या साहित्यीक संस्थेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी आटपाडीचे जेष्ट पत्रकार सादिक खाटीक यांची नियुक्ती केल्याचे इर्जिकचे प्रदेशाध्यक्ष कवीवर्य नारायण सुमंत यांनी पत्राद्वारे कळविले आहे .
इर्जिकचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे.दि २२, २३ मार्च रोजी सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यात सोलापुर – पुणे राष्ट्रीय महामार्ग वरील मोडनिंब- टेंभूर्णी दरम्यानच्या भोईजे – आहेरगांव फाटा येथील श्री संत गुरु रविदास महाराज आश्रमाच्या परिसरात राज्यस्तरीय शिवार साहित्य संमेलन संपन्न होत आहे. या निमित्ताने सादिक खाटीक यांच्या नियुक्तीच्या माध्यमातून इर्जिक परिवाराने सादिक खाटीक यांच्यासह आटपाडी आणि माणदेशाचा अप्रत्यक्षरित्या गौरव केला आहे .
१९८६ पासून साहित्यीक विश्वात कार्यरत असणाऱ्या सादिक खाटीक यांनी अनेक साहित्यिक उपक्रम राबविण्यात मोठी भूमिका बजावली आहे .शेटफळे येथील गदिमा स्मारक उभारणीसाठी सादिक खाटीक यांनी बजावलेली भूमिका प्रशंसनीय अशीच होती .
कवीवर्य नारायण सुमंत यांनी घेतलेल्या सादिक खाटीक यांच्या नियुक्ती प्रस्तावाला माजी प्राचार्य डॉ सयाजीराजे मोकाशी शेटफळे,कवी ज्ञानेश डोंगरे चोपडी,माजी प्राचार्य टी के वाघमारे नाझरे ,कवी शिवाजी बंडगर सांगोला, सुरेश लोंढे, राजाभाऊ शिंदे माढा,संग्राम जाधव आटपाडी,अशोक माळी पंढरपूर यांच्यासह इर्जिक परिवाराने एकमुखी समर्थन दिले.
राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार,माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विद्यमान मंत्री जयकुमार गोरे,खासदार धैर्यशील मोहिते पाटील,आमदार अभिजीत पाटील, आमदार नारायण पाटील, आमदार सुरेश धस,माजी आमदार बबनराव शिंदे,माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार प्रशांत परिचारक, साहित्यीक विठ्ठल वाघ,डॉ सदानंद मोरे, व्यंगचित्रकार संतोष तांदळे,डॉ नरेंद्र पाठक, पाशा पटेल, नितीन कुलकर्णी, लता ऐवळे, अश्विनी लिके, कु .गौरी घाडगे, सौ राजेश्वरी वैद्य जोशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हे शिवार साहित्य संमेलन होत आहे .