रा.स्व.संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक वि.मा.मिरासदार यांचे निधन
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, आपटे उपलब्ध प्रशालेचे माजी मुख्याध्यापक विठ्ठलराव मारुती तथा वि.मा.मिरासदार वय 91 यांचे दुःखद निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक जबाबदाऱ्या मिरासदार यांनी आजपर्यंत पार पाडल्या आहेत. तालुका संघचालक, जिल्हा संघचालक व पुणे विभाग संघचालक अशा जबाबदाऱ्या यापूर्वी त्यांनी पार पाडल्या आहेत. आपटे उपलप प्रशालेचे दीर्घकाळ मुख्याध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.भारत विकास परिषद व अन्य सामाजिक संस्था संघटनां मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

पंढरपूरच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात ते सतत कार्यरत होते. महाराष्ट्राचे प्रसिद्ध विनोदी साहित्यिक द.मा.मिरासदार यांचे ते बंधू होते तर ज्येष्ठ पत्रकार चंद्रहास मिरासदार यांचे वडील होते.
मिरासदार यांच्या पश्चात तीन बंधू, तीन भगिनी, मुलगा, सून, मुलगी, जावई व नातू असा परिवार आहे.