पंढरपूर तहसीलदार सोमवारी आणि गुरुवारी नागरिकांना भेटणार
पंढरपूर,दि.१५:- पंढरपूर तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तहसीलदार यांना दर सोमवारी व गुरुवारी दुपारी ३ ते ५ पर्यंत नागरिकांना आपल्या कामानिमित्त भेटता येईल, अशी माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली.
नागरिक ग्रामीण भागातून आल्यावर तहसीलदार बैठकीस किंवा गावभेटीच्या निमित्ताने बाहेरगावी असल्यास त्यांची भेट होत नाही. त्यासाठी ही आठवड्यातून दोन वेळेस लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तहसीलदार उपस्थित असणार आहे.
संबंधित वेळेत तक्रारदार नागरिक,अभ्यागत व शेतकऱ्यांनी त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या वेळेत तहसील कार्यालयात भेट द्यावी तसेच महत्त्वाच्या प्रशासकीय कामानिमित्त तहसीलदार बाहेरगावी असतील तर निवासी नायब तहसीलदार यांची भेट घ्यावी असे आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.