सरकोलीच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा
सरकोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सरकोली ता पंढरपूर येथील समाधान सुभाष पवार हे मंत्रालय क्लार्कची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
समाधान सुभाष पवार हे सध्या ज्युडिशियल कोर्टात क्लार्क म्हणून नेमणूकीस आहेत. त्यांचा आणखी एक क्लास टु परीक्षेचा निकाल येणार आहे.
मुळचे सरकोलीचे रहिवासी असलेले मुंबई येथे मंत्रालय मध्ये कार्यरत पितांबर भोसले (सचीव) तसेच दतात्रय भालके अव्वर सचिव मंत्रालय ,सुनील भालके कक्ष अधिकारी मंत्रालय , त्यांच्या पत्नी सौ सारीका सुनील भालके कक्ष अधिकारी, नितीन भोसले क्लार्क व आता समाधान पवार क्लार्क पदावर असताना आणखी दोन बांधवांचा मंत्रालय क्लार्क पदाचा रिझल्ट येणार आहे.
महाराष्ट्र शासन साखर भवनचे मा.मुख्य प्रशासक व मा.सहकार विभागाचे सह आयुक्त डॉ संजय भोसले यांच्या मार्गदर्शनाने युवकांना स्पर्धा परीक्षेची प्रेरणा मिळाली. समाधान सुभाष पवार यांचे सरकोली पर्यटन स्थळ निर्मिती आणि ग्रामस्थ यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
महसूल,पोलीस,जिल्हा परिषद,महापालिका, इस्त्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ,भारतीय सैन्यदल, जिल्हा न्यायाधीश, समाजकल्याण, सेलटॅक्स, कृषी,दारू बंदी,इरिगेशन,पंचायत समिती तसेच प्रायव्हेट कंपनी येथे आमच्यातील बंधू भगिनी अधिकारी पदावर आहेत.या सर्व बंधू भगिनींनी गावाच्या विकासासाठी आणि पर्यटन स्थळ निर्मितीच्या विकासासाठी सहकार्य देणार असल्याची भावना व्यक्त केली असल्याचे विलास श्रीरंग भोसले मा.पोलीस अंमलदार यांनी सांगितले.