सोलापूर जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती
सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागातील एकूण चौसष्ट पुरुष व महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीने समुपदेशन

पंढरपूर/अमोल कुलकर्णी/ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागातील एकूण चौसष्ट पुरुष व महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचे दहा मार्च रोजी पदोन्नतीने समुपदेशन करण्यात आले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम,उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले यांनी पदस्थापना आदेश दिले.

यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष महेश जाधव ,जिल्हा अध्यक्ष शिवाजी कांबळे, सरचिटणीस धनाजी मस्के, महिला हक्क व संरक्षण समिती राज्य संघटक वंदना लोखंडे,जिल्हा अध्यक्ष संगीता हांडे,तांत्रिक पतसंस्थेचे चेअरमन श्रीमंती सलगर,पतसंस्था क्र दोनच्या संचालक राणी सुतार उपाध्यक्ष प्रकाश बिराजदार, कार्याध्यक्ष श्रीकृष्ण घंटे व संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.