खासदार प्रणिती शिंदे यांनी महाशिवरात्री निमित्त लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी शिवमंदिरात पूजा करून घेतले दर्शन

सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज-खासदार प्रणिती शिंदे यांनी महाशिवरात्री निमित्त सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील सिध्देश्वर मंदिर, पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथील शंभू महादेव मंदिर, मोहोळ तालुक्यातील परमेश्वर पिंपरी येथील परमेश्वर मंदिर व सोलापूर शहरातील विविध ठिकाणी असलेल्या शिव मंदिरांना भेट देऊन भगवान श्री शंकराची बेलपत्र आणि फुले वाहून मनोभावे दर्शन घेतले तसेच शिवपूजा व मंगल आरती करून सर्वांच्या कल्याणाची,मांगल्याची,सुखी जीवनासाठी प्रार्थना भगवान शंकराच्या चरणी केली.

भाविकांशी संवाद साधत महाशिवरात्रीच्या मंगलमयी पर्वाच्या सर्वांना खासदार प्रणिती शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रशांत साळे,रवीकांत कोळेकर,अण्णासाहेब शिरसट, डोके साहेब,अर्जुन पाटील, संदीप पाटील,सुलेमान तांबोळी, राजेश पवार,मनोज यलगुलवार,किरण घाडगे,नितीन शिंदे, रांजणीचे माजी सरपंच दादा ढोले,सरपंच हेमंत दांडगे, उपसरपंच मारुती भाकरे,सुभाष दांडगे,सुरेश घायाळ,कैलास घायाळ, दत्तात्रय दांडगे, विठोबा पुजारी, मलकु दुधाळ, हरिदास बंडगर ,दत्तात्रय बचुटे यांच्यासह ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.