नागरी हिवताप योजना मलेरिया विभाग पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर यांच्या कार्यालयामार्फत राष्ट्रीय डेंग्यू दिवस १६ मे साजरा

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –दि.१६/०५/२०२४ रोजी नागरी हिवताप योजना मलेरिया विभाग पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर यांच्या कार्यालयामार्फत राष्ट्रीय डेंग्यू दिवस १६ मे साजरा करण्यात आला.

या दिनाचे औचित्य साधून प्रभात फेरीचे व कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
महाव्दार चौक,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शिवाजी चौक,अर्बन बँक चौक,आठवडी बाजार येथे कॉर्नर सभा घेण्यात आल्या.

या प्रभात फेरी व कॉर्नर सभा मध्ये डेंग्यू, चिकुनगुनिया, हिवताप, जे.ई. मेंदूज्वर या सारख्या आजाराबाबत जनजागृती करण्यात आली.या आजारा विषयी प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत पंढरपूर शहरातील नागरिकांना माहिती देण्यात आली.

डेंग्यू निर्मुलन या वर्षाचे घोष वाक्य- समुदायाच्या संपर्कात राहा, डेंग्यूला नियंत्रित करा, या घोषणाचे माध्यमातून आवाहन करण्यात आले .

डेंग्यू बाबत डंख छोटा धोका मोठा,गप्पी मासे पाळा, डेंग्यू, चिकुनगुनिया टाळा अशा घोषणा देण्यात आल्या. डास निर्मूलनासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली.

प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत घरातील भांडी बॅरल, सिमेंट टाकी, सिंटेक्स टाकी, हौद, स्वच्छ करण्यास व झाकूण ठेवण्यास सांगण्यात आले.गप्पी मासे पाळणे व मच्छरदाणीचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली.

सर्व नागरिकांना व भाविकांना डास अळी, गप्पी मासे दाखविण्यासाठी प्रदर्शन ठेवण्यात आले होते.याठिकाणी आरोग्य शिक्षणही देण्यात आले.

सदर प्रभात फेरी व कॉर्नर सभामध्ये सुनिल वाळूजकर उपमुख्याधिकारी पंढरपूर नगरपरिषद उपस्थित होते. जीवशास्त्रज्ञ श्रीमती शुभांगी तु.अधटराव नागरी हिवताप योजना नगरपरिषद पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिक्षण देण्यात आले. यावेळी आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, नागरी हिवताप योजनेमधील कंत्राटी कर्मचारी व पंढरपूर शहरातील नागरिक उपस्थित होते.