रोजगार हमी योजनामंत्री भरत गोगावले यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,उ.मा.का.,दि 19:- राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे,रो.ह.यो.उपजिल्हाधिकारी अंजली मरोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे,पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे,गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
