काही तासांतच आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यांचा बेस्ट डिटेक्शन अवॉर्डने सन्मान
सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांना बेस्ट डिटेक्शन अवॉर्डने केले सन्मानित

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज : चाकूचा धाक दाखवून मोबाइल
आणि पिकअप गाडी चोरणाऱ्या तीन आरोपींना पंढरपूर तालुका पोलिसांनी अटक करुन एकूण ११ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.काही तासांतच आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी केल्याप्रकरणी सोलापूर जिल्हा ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांना बेस्ट डिटेक्शन अवॉर्डने सन्मानित केले आहे.

रॉबरीच्या गुन्ह्यात तीन आरोपींनी मध्यप्रदेश पासिंगची पिकअप गाडी क्रमांक एमपी ०९ एस ३०१० या गाडीच्या चालकाला चाकूचा धाक दाखवून चालकाला मारहाण करून पिकप गाडी जबरदस्तीने चोरून पिकअप गाडी घेऊन पळून गेले होते. या गुन्ह्यामध्ये आरोपीच्या वर्णनावरून तीन आरोपी ताब्यात घेतले. सुमारे १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

