ही सर्व शहरे महामार्गाशी थेट जोडली गेल्याने शहरातून बाहेर पडण्यास लागणारा वेळ होणार कमी – खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

मुंबई, नवी मुंबई गाठण्यासाठी प्रस्तावित एक्सप्रेस कंट्रोल मार्गाच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने मागवल्या निविदा

ही सर्व शहरे महामार्गाशी थेट जोडली गेल्याने शहरातून बाहेर पडण्यास लागणारा वेळ होणार कमी -खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

ठाणे/ज्ञानप्रवाह न्यूज – बदलापूर,अंबरनाथपासून ते कल्याण डोंबिवलीपर्यंतच्या वाहनचालकांना शहरांतर्गत प्रवास टाळून थेट नवी मुंबई, मुंबईचा प्रवास करता यावा असे स्वप्न पाहिले होते त्यासाठी एक्सेस कंट्रोल मार्गाची संकल्पना मांडली होती असे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

एमएमआरमधील मुंबई, नवी मुंबई या शहरांपर्यंत जाण्यासाठी सध्या डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांतील प्रवाशांना मोठा वळसा घालून जावा लागतो.हा वेळखाऊ गर्दीतील प्रवास लवकरच थांबणार असून बदलापूर हून थेट मुंबई, नवी मुंबई गाठण्यासाठी प्रस्तावित असलेल्या एक्सप्रेस कंट्रोल मार्गाच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने निविदा मागवल्या आहेत.ही सर्व शहरे महामार्गाशी थेट जोडली गेल्यास शहरातून बाहेर पडण्यास लागणारा वेळ कमी होणार आहे.

बदलापूर येथून जाणाऱ्या मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्गाच्या येथून या रस्त्याची सुरुवात करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. या मार्गावरून पुढे जात पालेगाव, कल्याण पूर्वेतून जात हेदुटणे मार्गाला जोडण्याची शक्यता आहे. येथे मेट्रो १२ ची उभारणी सुरू आहे. तसेच येथून कल्याण रिंग रोडचा प्रकल्पही जोडला जातो. कल्याण-शिळफाटा मार्गदेखील येथून जवळच आहे.पुढे शिरढोण येथे महत्त्वाकांक्षी मल्टी मोड कॉरिडोर महामार्गाला जाता येणे शक्य होणार आहे.मुंबई नवी मुंबई ते थेट कल्याण-बदलापूर एक्सेस कंट्रोल महामार्ग आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सर्वप्रथम मागणी केली होती.बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, २७ गावे, डोंबिवली, कल्याणचा ग्रामीण भाग या भागाला नवी कनेक्टिव्हिटी या मार्गामुळे मिळणार आहे.

एमएमडआरडीएच्या माध्यमातून ती संकल्पना आता प्रत्यक्षात उतरत आहे. लवकरच असा प्रवास शक्य होणार आहे.

Shivsena,DrShrikantEknathShinde,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top