जया एकादशी निमित्त श्री विठ्ठल- रक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती सदस्य संभाजी शिंदे यांच्याकडून फराळाचे वाटप

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज: माघी शुध्द जया एकादशी निमित्त मंदीर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची नित्यपूजा संपन्न झाली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदीर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली.

यावेळी आमदार तुकाराम काते,सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, मंदिर समितीच्या सदस्या ॲड.माधवी निगडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले,पंढरपूर शहरचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके,शंकर पटवारी,व्यवस्थापक मनोज श्रोत्री उपस्थित होते.

माघी जया एकादशी निमित्त श्री विठ्ठल- रक्मिणी च्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती सदस्य संभाजी शिंदे यांच्याकडून फराळाचे वाटप करण्यात आले.
