क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि ०८:- राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज माघ शुद्ध जया एकादशीनिमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समिती चे लेखा अधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी तहसीलदार सचिन लंगुटे, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार,पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
माघी शुध्द जया एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत.

मंदिर परिसर तसेच प्रदक्षिणा मार्गावर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी लक्षात घेऊन तसेच भाविकांना वाहतुकीचा कोणताही त्रास होऊ नये क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे हे शिवाजी चौक येथून मंदिरापर्यंत दर्शनासाठी चालत गेले.