द.ह.कवठेकर प्रशालेच्या चौदाशे विद्यार्थ्यांचा गीतबहार हा समूह गीत गायन कार्यक्रम संपन्न

द.ह.कवठेकर प्रशालेच्या चौदाशे विद्यार्थ्यांचा गीतबहार हा समूह गीत गायन कार्यक्रम संपन्न

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- एक सुर एक ताल हा सुरसंगमाचा आज प्रत्यक्ष अनुभव गीतबहार या कार्यक्रमात पंढरपूरकरांना अनुभवायला मिळाला.निमित्त होते वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमातील समूहगान कार्यक्रम. या कार्यक्रमाला प्रमुख अभ्यागत म्हणून संगीत क्षेत्रातील नामवंत डॉ प्रसाद कुलकर्णी व सौ. आसावरीताई पटवर्धन हे उपस्थित होते.

पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित द.ह.कवठेकर प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलनातील तिसरे पुष्प गीतबहार समूहगीत गायन हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 31 जानेवारी रोजी संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष नाना कवठेकर, संस्थेचे सचिव सुधीर पटवर्धन सर, एस.पी.कुलकर्णी सर,डॉ मिलिंद जोशी, संजय कुलकर्णी हे संस्था सदस्य उपस्थित होते.पालक शिक्षक संघाचे श्रीयुत वगरे सर,श्रीमती शिंदे मॅडम,शाळा व्यवस्थापन समितीच्या सौ.दिपाली सतपाल, महेश तेंडुलकर ,सौ.कुलकर्णी मॅडम उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक व्ही.एम. कुलकर्णी सर यांनी केले. त्यांनी समूहगीत गायनाची आठवण सांगताना प्रशालेत मागच्याच वर्षी समूहगीतगायन कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची आठवण सांगितली. संस्थेच्या कवठेकर प्रशालेमधील समूहगीत गायनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे देखील आवर्जून आले होते हे नमूद केले. विद्यार्थ्यांच्या अंगातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रशाला नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवते हे मुख्याध्यापकांनी सांगितले.

देशभक्तीपर गीते,सामाजिक सद्भावना जपणारी गीते विद्यार्थ्यांनी सादर केली. यासाठी मार्गदर्शन प्रशालेतील राजेश खिस्ते सर, उमेश केसकर सर,संजय गोसावी यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनादी मी अनंत मी हे गीत चाल अवघड असून सुद्धा विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या समूह गान केले.

प्रमुख अभ्यागत डॉ कुलकर्णी यांनी शिक्षकांचे कौतुक करताना शाळा ही नवरत्नांचा दरबार आहे असा कौतुकाने उल्लेख केला.

प्रमुख अभ्यागता सौ.आसावरीताई पटवर्धन यांनी समूहगीत ऐकताना स्वतःचे शालेय जीवन आठवले असे आठवणीने सांगितले. विद्यार्थ्यांच्या एकत्र समूह गायनाने प्रशालेचा संपूर्ण आवार सुरांनी भारलेला होता.

कार्यक्रमाचे आभार प्रशालेचे पर्यवेक्षक आर. एस.कुलकर्णी सर यांनी मानले.पसायदान गाऊन कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. एम.कुलकर्णी सर,उपमुख्याध्यापक श्री. रुपनर सर,पर्यवेक्षक आर.एस. कुलकर्णी सर यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी पालक बंधु भगिनी व प्रशालेचे शिक्षक ,शिक्षकेतर बंधु भगिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top