सायबर गुन्हेगारांकडून होत असलेली फसवणुक हा एक प्रकारचा आर्थिक दहशतवाद -पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील

पालघर पोलीस दलाकडून सायबर गुन्हे मुक्त गाव मोहीमेचे आयोजन

सायबर गुन्हेगारांकडून होत असलेली फसवणुक हा एक प्रकारचा आर्थिक दहशतवाद -पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील

पालघर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२१/०१/२०२५ – सध्याच्या डिजीटल युगात प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोन, इंटरनेटचा वापर करत आहे. सायबर गुन्हेगार नागरीकांना वेगवेगळे आमिष दाखवणारे फोन कॉल करत असतात. काही नागरीक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळे सायबर गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. सायबर गुन्हेगारांकडून होत असलेली फसवणुक हा एक प्रकारचा आर्थिक दहशदवाद आहे. पालघर जिल्हयातील नागरीक सायबर गुन्हयांना बळी पडु नये तसेच त्यांचेमध्ये सायबर साक्षरता निर्माण करण्यासाठी पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे संकल्पनेतुन जनसंवाद अभियान अंतर्गत पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सायबर गुन्हे मुक्त गाव ही मोहिम राबविण्यात येत आहे.

सायबर गुन्हे मुक्त गाव मोहीम अंतर्गत पालघर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार हे आपल्या गावात येवुन सायबर गुन्हे जनजागृतीसाठी सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे व वाईट चालीरीती बाबत तयार करण्यात आलेली चित्रफित दाखविणार आहेत.आपणास या सर्व विषयाबाबत काही प्रश्न असल्यास त्यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.

पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हयातील सर्व नागरीकांना सायबर व आर्थिक गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडू नये, तसेच आपले नातेवाईक, मित्र परिवार यांचेमध्येही याबाबत जनजागृती करावी. पालघर जिल्हा सायबर साक्षर करण्यासाठी सायबर क्राईम मुक्त जिल्हा या मोहीमेसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top