माणदेश जिल्ह्याचे, जिल्हा ठिकाण आटपाडीच व्हावे- सादिक खाटीक

माणदेश जिल्ह्याचे, जिल्हा ठिकाण आटपाडीच व्हावे- सादिक खाटीक


आटपाडी दि.२०,ज्ञानप्रवाह न्यूज – नियोजित माणदेश जिल्ह्याचे जिल्हा ठिकाण आटपाडीच व्हावे या मागणीचा पुनर्उच्चार आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक यांनी केला आहे .१९८७ – ८८ पासून या मागणीसाठी सातत्याने आवाज उठवित आलेल्या सादिक खाटीक यांनी नुकतेच ११ जानेवारी रोजी या संदर्भात विस्तृत लिखाण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते .

राज्यात नव्याने निर्माण होणाऱ्या अनेक जिल्ह्यात माणदेश जिल्ह्याचा समावेश असल्याच्या वार्तेने आटपाडी तालुक्यात, माणदेशात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे . या पार्श्वभूमीवर आपले अनेक वर्षाच्या स्वप्नाला वास्तवात येण्याचा महुर्त लागतो आहे हे लक्षात घेऊन सादिक खाटीक यांनी राज्यातील असंख्य मान्यवरांचे याकडे लक्ष वेधून घेतले आहे.शंभर वर्षे मागास, उपेक्षित,वंचित राहीलेल्या आटपाडीचे सुपर दिन यायचा योग आला आहे. जिल्हा ठिकाण झाल्यास आटपाडी शहराला चौफेर विकासाचे प्रचंड स्वरूप येवू शकते. हतबल राहिलेली,ठेवली गेलेली आटपाडी व तालुका, माणदेश जिल्ह्याचे जिल्हा ठिकाण म्हणून आटपाडीचा निर्णय झाल्यास सर्वार्थाने पुढे जाणार असल्याने काही जणांची अस्वस्थता वाढीस लागली आहे याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली .

आटपाडीतून ३ राजमार्ग जात आहेत .३ राष्ट्रीय महामार्ग आटपाडी पासून १० ते ३० किमी अंतरावरून जात आहेत . यापैकी एक राष्ट्रीय महामार्ग गेला आहे . आणखी दोन राष्ट्रीय महामार्ग लवकरच साकारत आहेत, याचा मोठा फायदा आटपाडीला होत आहे . माणदेश जिल्ह्यात समाविष्ट होणाऱ्या सर्व तालुक्यात, आटपाडी मध्यवर्ती ठिकाणी येते आहे . जिल्हास्तरावरील अनेक कार्यालये उभारणीसाठी आटपाडी शहराच्याच हद्दीत १०० एकरापेक्षा जास्त गायरानाची शासकीय जमीन उपलब्ध होवू शकते. शिवाय आटपाडीच्या मध्यवर्ती ठिकाणाच्या २० हून अधिक एकरातील शासकीय जमीनीवरील अतिक्रमण काढल्यास ही जमीनही उपलब्ध होवू शकते.देवस्थान इनाम वर्ग ३ च्या काही जमिनीचे चुकीचे व्यवहार रद्द केल्यास यातूनही ५ – १० एकर अतिशय मोक्यावरची जमीन उपलब्ध होवू शकते.

जिल्हा ठिकाण आटपाडी होण्याची हातातोंडाशी आलेली संधी आटपाडी तालुकावासियांच्या हातून गेली तर काळ आटपाडी तालुकावासियांना माफ करणार नाही.जागे व्हा आवाज उठवूया, एकत्र येवू या आणि आपली न्याय भूमिका शासन दरबारी पटवून देण्यासाठी शासनकर्त्यांकडे वेगवेगळ्या प्रकारे पाठपुरावाही करूया असे आवाहनही सादिक खाटीक यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top