जनसामान्यांच्या आशीर्वादाने सोलापुरात पुन्हा येणार मोदीजींचा शिलेदार

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.05/05/2024 – सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने पंढरपूर येथे भव्य यात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेला सहभागी होत महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने फिर एक बार मोदी सरकार, अब की बार ४०० पार अशा घोषणा देत स्वागत केले आणि आपलाच विजय होणार अशा शुभेच्छा दिल्या.

या पदयात्रेत नागरिकांनी दिलेला प्रतिसाद उत्स्फूर्त होता. नागरिकांच्या भेटी-गाठी घेत, त्यांच्या अपेक्षाही महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी जाणून घेतल्या.यंदाची सार्वत्रिक निवडणूक ही देशाच्या भविष्यासाठी अतिशय महत्त्वाची असून विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी उपस्थित नागरिकांना आवाहन केले.

यावेळी युवानेते प्रणव परिचारक, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.