आमदार झाल्याबद्दल माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांचा मक्का मस्जिद जमातीच्या वतीने सत्कार
आपल्या या प्रेमातून कधीच उतराई होता येणार नाही असंच आपलं प्रेम कायम सोबत असू द्या – आमदार अभिजीत पाटील

करकंब/ज्ञानप्रवाह न्यूज- करकंब ता.पंढरपूर येथील मक्का मस्जिद जमातीच्यावतीने आमदार झाल्याबद्दल माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मी निवडून यावे म्हणून अनेकांनी दुवा केली, तर कुणी चप्पल घालणं सोडलं, तर कुणी पायी हजारो किलोमीटर देवदर्शन केलं.निवडणुकीच्या दरम्यान प्रत्येकांनी आपआपल्या परिनं मोलाचे योगदान दिल्यामुळेच हे यश मिळाले. आपल्या या प्रेमातून कधीच उतराई होणार नाही असंच आपलं प्रेम कायम सोबत असू द्या अशा शब्दांत आपल्या भावना नूतन आमदार अभिजीत पाटील यांनी आपल्या सत्कार प्रसंगी व्यक्त केल्या.

यावेळी अध्यक्ष मुसाभाई बागवान, हारुन भाई बागवान, श्री.एजाजभाई, श्री. युसुफभाई,कय्युमभाई मुल्ला तसेच बार्डीचे मौलाना अशपाक पटेल व पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष अँड नानासाहेब शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
