महाराष्ट्र राज्य कला संचालनालय मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला इंटरमिजिएट परीक्षा 2024 मध्ये द.ह. कवठेकर प्रशालेचे मोठे यश
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –महाराष्ट्र राज्य कला संचालनालय मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला इंटरमिजिएट परीक्षा 2024 मध्ये द.ह. कवठेकर प्रशालेने मोठे यश संपादन केले आहे. इंटरमिजिएट परीक्षेत प्रशालेतील विद्यार्थी अथर्व अमित वाडेकर याने राज्य गुणवत्ता यादी मध्ये 21 वे स्थान पटकावले. याच गुणवत्ता यादीत प्रशालेतील विद्यार्थिनी कु.सान्वी सचिन कलढोणे हिने राज्यात 26 वा क्रमांक पटकाविला आहे.

त्याचबरोबर प्रशालेतील 10 विद्यार्थी A ग्रेड प्राप्त असून 09 विद्यार्थी B ग्रेड प्राप्त करून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे जेष्ठ कलाशिक्षक अमित वाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.कला संचालनालयातर्फे दरवर्षी एलिमेंटरी व इंटरनेट या दोन चित्रकला परीक्षा मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात.यावर्षी या दोन्ही परीक्षेस संपूर्ण महाराष्ट्रातून 7 लाख 50 हजार 935 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
प्रशालेस मिळालेल्या या यशाबद्दल पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव एस. आर.पटवर्धन सर,सु.त्रिं. अभ्यंकर सर,संस्थेचे अध्यक्ष नाना कवठेकर,चेअरमन वीणाताई जोशी व सर्व संचालक मंडळ तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम.कुलकर्णी सर, उपमुख्याध्यापक श्री रुपनर सर, पर्यवेक्षक आर.एस.कुलकर्णी सर यांनी अभिनंदन केले.ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्राप्त ग्रेडनुसार बोर्डाचे वाढीव गुण मिळण्याचा लाभ विद्यार्थ्यांना होतो.

यावर्षी वाढीव गुण प्राप्त 19 विद्यार्थी असून त्यांचे प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पुणे विभागीय बोर्डाकडे पाठविण्यात आले असल्याचे मुख्याध्यापक व्ही.एम.कुलकर्णी यांनी सांगितले.
एकाच प्रशालेतील दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आले असून दहा विद्यार्थ्यांना ए ग्रेड प्राप्त झाल्यामुळे या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक होत आहे.
