स्वेरीत द फ्युजन ऑफ सेमी कंडक्टर एडव्हान्समेंट अँड ए.आय पॅराडायम्स विषयी कार्यशाळा संपन्न  

स्वेरीत द फ्युजन ऑफ सेमी कंडक्टर एडव्हान्समेंट अँड ए.आय पॅराडायम्स विषयावर कार्यशाळा संपन्न  

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०१/२०२५ – गोपाळपूर ता. पंढरपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि  बिदर कर्नाटक मधील गुरुनानक देव इंजिनिअरिंग कॉलेज  यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (FDP) अंतर्गत दि.२३ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२४ दरम्यान आठवडाभर शिक्षक विकास कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली.
        
गुरुनानक देव इंजिनिअरिंग कॉलेजचे अध्यक्ष डॉ.सरदार बलबीरसिंग व स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली. ‘द फ्युजन ऑफ सेमी कंडक्टर एडव्हान्समेंट अँड ए.आय पॅराडायम्स’ या विषयावर या कार्यशाळेचे आयोजन केले होते. ही कार्यशाळा हायब्रिड मोडमध्ये आयोजित केली होती.

या कार्यशाळेत महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील जवळपास १४० हून अधिक संशोधक, प्राध्यापकांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेचे प्रायोजक  इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स  (आयईईई) बॉम्बे सेक्शन हे होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड  इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आयईईई) बॉम्बे सेक्शनचे अध्यक्ष आनंद घारपूरे आणि  सहायक प्राध्यापक डॉ. सुक्रुती कौलगुड यांचे सहकार्य लाभले.या कार्यशाळेचे आयोजन  स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या  उपप्राचार्या डॉ.मीनाक्षी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

पहिल्या दिवशी कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी(डीबीआयटी) मुंबई चे प्राचार्य डॉ.सुधाकर मांडे यांनी माहिती दिली.

दुसऱ्या दिवशी इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड  इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आयईईई) च्या एपीएस-इडीएस च्या अध्यक्षा आणि फ्र. कोंसिसाओ रोड्रिग्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई च्या प्रा.डॉ.स्वप्नाली आशिष माकडेय यांनी व्याख्यान दिले.

तिसऱ्या दिवशी हैद्राबाद मधील मारी लक्ष्मण रेड्डी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड मॅनेजमेंटचे के.मणिकांता यांनी कार्यशाळा घेतली.

चौथ्या दिवशी दोन सत्रे आयोजित केली होती यामध्ये पहिल्या सत्रात व्हीआयपीटी- एपी विद्यापीठ अमरावती तर दुसऱ्या सत्रात व्हीएनआयटी नागपूरचे डॉ.गणेश पाटील यांचे व्याख्यान झाले.

पाचव्या दिवशीच्या दोन अतिरिक्त सत्रात मणिपूर इम्फाळ च्या एनआयटी मधील डॉ. मनोज जोशी यांचे तर दुसऱ्या सत्रात याच महाविद्यालयातील डॉ. वांगखैरकपम वंदना देवी यांचे व्याख्यान झाले.

सहाव्या दिवसी रेखा चंद्रराव यांनी शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगासने करून घेतले.त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. या कार्यशाळेतील विशेषज्ञ सत्रे, कार्यशाळा आणि संवादात्मक चर्चांमध्ये सेमीकंडक्टर तंत्रज्ञान आणि ए.आय. क्षेत्रातील चालू ट्रेंड्सवर चर्चा करण्यात आली.या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती, डॉ. वीरेंद्र डाकुलगी आणि डॉ. किशन सिंग यांनी केले तर यासाठी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंतर्गत असलेल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. डॉ. नीता कुलकर्णी आणि प्रा. रजनी पटेल यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.सुमंत आनंद यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top