बाळशास्त्रींचा आदर्श सर्वानी घ्यावा – विक्रमसिंह बांदल

बाळशास्त्रींचा आदर्श सर्वानी घ्यावा – विक्रमसिंह बांदल

राज्यकर्ते, पत्रकारांनी एकत्र यावे – ब्रम्हानंद पडळकर

शहानिशा करूनच लेखणीचे शस्त्र चालवावे – तानाजी पाटील

प्रचंड विकासाला सर्वांनी प्रथम प्राधान्य द्यावे – सादिक खाटीक

आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज-आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून सर्व समाजाला दिशा देण्या बरोबरच सत्याचा आरसा दाखविण्याचे काम केले आहे.हा आदर्श सर्वांनी अंगिकारावा, असे आवाहन खानापूर-आटपाडीचे प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांनी केले.

आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण वृत्तपत्राच्या मराठी पत्रकार दिन म्हणून आज इलेक्ट्रॉनिक्स मिडिया च्या पत्रकारांनी सर्व समाज घटकांना एकत्र आणून साजरा केला त्यावेळी विक्रमसिंह बांदल बोलत होते .

प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे हस्ते प्रतिमा पुजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले . स्वागत प्रास्ताविक पत्रकार अंकुश मुढे यांनी केले.अशोक पवार यांनी मनोगत व्यक्त केले .

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल,तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे, जिल्हा बॅक संचालक तानाजी पाटील, जि.प.समाजकल्याणचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते वैभव पाटील, हणमंतराव देशमुख, सादिक खाटीक, अनिताताई पाटील,काँग्रेस आय चे नेते डी . एम पाटील सर, जयवंत सरगर, विनायक पाटील, दत्तात्रय पाटील, मनोज नांगरे, फिरोज मुलाणी, प्रभाकर नांगरे, डॉ तुषार पवार,अश्विन नांगरे,मंगेश हजारे,प्रेम नाईकनवरे,सुनिल लेंगरे, तालुका विधी सेवा समितीचे ॲड सचिन सातपुते, आटपाडी भुषण पुरस्काराचे मानकरी सोपान काळे , ज्योतीराम काटकर, सुनीता माळी,अभिजीत माळी,प्रा. सदाशिव मोरे, संतोष ऐवळे यांच्यासह ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते अशोक गायकवाड शेटफळे, मारुती रोकडे करगणी, नागराज वाघमारे दिघंची, ज्येष्ठ पत्रकार म्हणून सन्मानित झालेले बंडोपंत देशमुख, सादिक खाटीक, महादेव लांडगे, कांतीलाल कारळे,इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया आटपाडीचे उपाध्यक्ष हबीब मुलाणी सचिव अशोक पवार, राजू शेख, लक्ष्मण खटके, नंदकुमार विभुते, मोहन पुजारी, अक्षय गायकवाड, अंकुश मुढे, तुकाराम गिड्डे, संतोष रणदिवे आदी अनेक जण उपस्थित होते .

आटपाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यकर्ते, पत्रकारांनी एकत्र यावे अशी माझ्यासारख्यांची भावना आहे . सादिकभाई सारख्या ज्येष्ट पत्रकारांनी सर्वपक्षीय राजकारणी मंडळी, सर्व पत्रकार यांचा समन्वय साधत आटपाडी तालुक्याच्या व्हीजनसाठी सर्वांना एकत्र आणावे . सामुदायीक ताकदीने समस्या मार्गी लावूया . एकमेकांच्या विकास कामात अडथळे आणण्याच्या आणि एकमेकांच्या जिरवण्याच्या वृत्तीला सर्वांनी मुठमाती देवू या.पत्रकारांनीही परस्पर वेगळी चुल न मांडता एकत्रितपणे असे उपक्रम साजरे करावेत अशा भावना जि प चे समाज कल्याण विभागाचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी यावेळी पत्रकारांना शुभेच्छा देताना व्यक्त केल्या .

राजकारणी मंडळी, शासकीय अधिकारी किंवा समाजातील अन्य घटकांच्या संदर्भातील पत्रक -निवेदनावरून एकतर्फी बातम्या न देता आक्षेपार्ह बदनामीकारक बातम्यांची शहानिशा करूनच पत्रकारांनी आपले लेखणीचे शस्त्र चालवावे.सादिक खाटीक हे अनेक लेखांच्या माध्यमातून महिन्या दोन महिन्यातून मोठी खळबळ माजवून देतात असे सांगली जि म स बँकेचे संचालक आणि शिवसेना शिंदे गटाचे खानापूर – आटपाडी मतदारसंघाचे नेते तानाजी पाटील यांनी सांगत सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या .

आटपाडी तालुक्यातील पत्रकारीतेला मोठी पार्श्वभूमी आहे असे सांगत ज्येष्ठ पत्रकार तथा कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करत पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

डॉ बाबासाहेब आंबेडकर बचत भवन मधील ध्वनी व्यवस्था आणि वर लटकत असलेले विकलांग अवस्थेतले अनेक पंखे आटपाडी तालुक्याच्या विकासाचे धिंडवडे काढत आहेत. अधिकारी महोदयांनी तात्काळ यावर उपाययोजना करावी, असा सल्ला देत राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य हणमंतराव देशमुख यांनी आटपाडी तालुक्याच्या पत्रकारीतेचा गौरव करत पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या .

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन परशुराम पवार यांनी केले तर आभार हाबीब मुलाणी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top