मरवडे येथे एकाच रात्री तीन घरफोड्या करून 1 लाख 82 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल केला लंपास
मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे एकाच रात्री तीन घरफोडया करून चोरटयांनी सोने, रोख रक्कम असा एकूण 1 लाख 82 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेले असून याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील फिर्यादी सचिन स्वामी हे व्यवसायाने टेलरिंगचे काम करीत असून दि.29 च्या पहाटे 4.00 च्या दरम्यान फिर्यादी यांचे 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे 28 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण,800 रुपये किंमतीचे चांदीचे गळयात घालण्याचे शिवलिंग,800 रुपये किमतीचे एक भार वजनाची चांदीची जोडवी,एक हजार रुपये किमतीचे टेलरिंग साहित्य, दुकानातील रोख रक्कम तसेच हरी जाधव यांची 20 हजार रुपये किमतीची 4 ग्रॅम वजनाची लेडीज अंगठी, त्याचबरोबर सचिन डांगे यांचे रोख 10 हजार रुपये असा एकूण 1 लाख 82 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
चोरटयांनी दगडू जाधव यांच्या बंद घराचे व दुकानाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरी केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.