लक्ष्मी दहिवडी येथे मन्ना नावाचा जुगार खेळणार्या अड्डयावर पोलिसांचा छापा सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल
मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी – मंगळवेढा तालुक्या तील लक्ष्मी दहिवडी येथे 52 पत्त्याच्या पानावर मन्ना नावाचा जुगार खेळणार्या अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून 800 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करून सुभाष बनसोडे वय 46,दत्ता रणदिवे वय 52,अशोक बनसोडे वय 41,दादासाो रणदिवे वय 41,विनोद बनसोडे वय 42,अंकुश बनसोडे वय 45 आदी सहा जणांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील वीर चौकात काही इसम गोलाकार बसून 52 पत्त्याच्या पानावर पैशाची पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांना मिळताच त्यांनी खाजगी वाहना व्दारे पोलिसाचें पथक पाठवून खातरजमा केली असता दि.26 रोजी 4.00 वा.वीर चौकात काही इसम गोलाकार बसून जुगार खेळत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी सदर घटनास्थळावरून रोख 830 रुपये रक्कम व अन्य जुगार साहित्य जप्त केले असून याची फिर्याद पोलिस अंमलदार शरद कदम यांनी दिली असून वरील सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी अवैध व्यवसायावर सातत्याने कारवाई करत पायबंद घालावा अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.
