अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत केली कारवाईची मागणी
मुंबई – मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांना तिच्या विरोधात चाललेल्या बदनामी कारक अपप्रचाराविरोधात निवेदन दिले.

यावेळी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्वस्त केले.
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेत त्यांना निवेदन दिले आणि कारवाईची मागणी केली.
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याविरोधात यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करत आहेत,अशीही तक्रार त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असता त्या सर्वांवरसुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिले.
