मंदिर समितीच्या सुरक्षा रक्षकाचा प्रामाणिकपणा
महिला भाविकाचे दागिने शोधून केले परत
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.23/12/2024 – सुजित शेळवणे मंडळाधिकारी टेंभुर्णी ता.माढा हे आपल्या कुटुंबासह रविवार दि.22 डिसेंबर रोजी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर संबंधित महिला भाविकाच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाल्याचे लक्षात आले. त्यांनी मंदिर समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता दर्शनरांगेतील रक्षक ग्रुपचे सुरक्षा रक्षक आदित्य बाबर यास सदर दागिने आढळून आले. त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षात दागिने जमा केले त्यानंतर खात्री करून संबंधित भाविकास ते परत करण्यात आले.
संबंधित दापत्यांने सदरबाब त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना संपर्क केला. व्यवस्थापक श्री श्रोत्री यांनी तात्काळ मंदिर समितीच्या नियंत्रण कक्षात संपर्क करून सुचना दिल्या.तद्नंतर सीसीटीव्ही ऑपरेटर यांनी कॅमेरातील रेकॉर्डींग पाहणी करून व सर्व सुरक्षा रक्षकांना वॉकीटॉकीद्वारे सुचना केल्या असता, दर्शनरांगेतील सुरक्षा रक्षक आदित्य तुकाराम बाबर, रक्षक ग्रुप यास सदरचे दागिने आढळून आल्यानंतर त्यांनी नियंत्रण कक्षात जमा केले व खात्री करून संबंधित भाविकास परत करण्यात आले.

सदरचे दागिने मिळाल्यानंतर प्रामाणिकपणे मंदिर समितीच्या कार्यालयात जमा केल्या बद्दल सुरक्षा रक्षकाचा मंदिर समिती मार्फत सन्मान केला व मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी देखील दुरध्वनीद्वारे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
सुजित शेळवणे यांचे कुटुंब श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे निस्सिम भक्त आहेत. सद्यस्थितीत,नाताळ / ख्रिसमस उत्सव सुरू असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.श्रीमती शेळवणे यांना मंगलसुत्र परत मिळाल्यानंतर त्यांच्या चेह-यावरील आनंद स्पष्टपणे दिसत होता.अवघ्या काही तासांनी आपल हरवलेल सौभाग्याचं लेणं मिळाल्याने त्यांनी मंदिर समितीच्या कर्मचा-यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
