द ह.कवठेकर प्रशालेत विद्यार्थ्यांच्या सर्व कलागुणांना वाव मिळतो- संस्था सचिव सुधीर पटवर्धन सर
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/१२/२०२४- पंढरपूर येथील द.ह.कवठेकर प्रशालेत मंगळवार दिनांक 17 डिसेंबर रोजी पालक सहविचार सभा संपन्न झाली.या सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत बऱ्याच तज्ञांनी मार्गदर्शन केले. सध्याच्या काळात विद्यार्थी फक्त परीक्षार्थी न बनता अष्टपैलू विद्यार्थी बनवा.यासाठी द. ह. कवठेकर प्रशाला नेहमीच प्रयत्न करते. यावर्षी तर प्रशालेत संगीत विषयक सुद्धा क्लास सुरू झालेले आहेत.त्याबरोबरच किमान कौशल्य विकसित चे कोर्सेसही द.ह.कवठेकर प्रशालेत सुरू करण्यात आले आहेत अशी माहिती संस्थेचे सचिव सुधीर पटवर्धन सर यांनी दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व अभ्यागतांचे स्वागत व प्रास्ताविक जेष्ठ शिक्षक आर.एस.कुलकर्णी सर यांनी केले. प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम.कुलकर्णी सर यांनी प्रशालेत झालेल्या सर्व सुधारणा पालकां समोर सांगून भविष्यातल्या योजना देखील व्यवस्थित मांडल्या.सर्व विद्यार्थी उपयोगी योजना राबवण्यासाठी पालक बंधूंनांही शारीरिक बरोबर आर्थिक मदतही करण्याचे आव्हान केले.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच प्रमुख ध्येय असल्याचे मुख्याध्यापक यांनी सांगितले.

पालक शिक्षक संघांचे उपाध्यक्ष श्री वगरे सर व श्रीमती शिंदे यांनी प्रशालेस सर्वतोपारी मदत करण्याचे आश्वासन दिले. शालेय व्यवस्थापनाच्या उपाध्यक्ष सौ दिपाली सतपाल यांनीही प्रशालेच्या सर्व उपक्रमांना मदत करण्याचे आवाहन पालक वर्गाला केले व आश्वासनही दिले की आम्हीही सर्व पालक वर्ग प्रशालेच्या सर्व विद्यार्थीपयोगी योजनांच्या मदतीसाठी तयार आहोत.पालक वर्गातून ज्या सूचना आल्या त्याची अंमलबजावणी करण्याची खात्री मुख्याध्यापकांनी दिले. आभार प्रदर्शन प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री रुपनर सर यांनी केले.
पालक शिक्षक संघाच्या सहसचिवा सौ. सीमा कुलकर्णी मॅडम यांनी विद्यार्थी हिताच्या सर्व योजना राबवण्यात प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.या कार्यक्रमासाठी पालक वर्ग मोठया प्रमाणात हजर होता.
