कर विभागात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

मंगळवेढा नगरपालिकेतील कर विभागात आर्थिक गैरव्यवहाराची सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मनमानी कारभार अधिकारी करत असले तरी सर्वसामान्य जनतेने कर रूपाने भरलेल्या पैशात कर्मचार्यांने गैरव्यवहार केल्याच्या विरोधात नगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांने तक्रार केल्याने नगरपालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंगळवेढा नगरपालिके तील करवसुलीमध्ये झालेल्या घोटाळ्याविषयी दत्तात्रय इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मंगळवेढा नगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे घरपट्टी पाणीपट्टी व इतर सरापती वसूल केलेले रक्कम नगरपालिकेच्या लेखा शाखेकडे न भरता परस्पर वापरून अपहार केल्याचे बाब लेखी परीक्षेमध्ये उघड होऊनही संबंधित लेखकावर कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे संदिपान दत्तात्रय इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे कारवाई करण्याची मागणी केली आहे.याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री,नगर विकासमंत्री,विभागीय आयुक्त, प्रशासक तथा प्रांत अधिकारी पंढरपूर मंगळवेढा चे आमदार समाधान आवताडे यांच्याकडे केली असून त्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की नगरपालिकेच्या 2022- 23 चे लेखापरीक्षण झाले आहे त्यामध्ये संकलित कर विभागाकडे लिपिकाने घरपट्टी पाणीपट्टी व इतर करांची रक्कम वसूल केली असून ती रक्कम लेखा शाखेकडे जमा न करता परस्पर वापरून त्या पैशांचा अपहार केला आहे.

याबाबत मुख्याधिकारी मंगळवेढा यांनी सदर लिपिकाला साधी नोटीस देखील काढलेली नसून सदर लिपिकास निलंबित करून त्याची चौकशी करणे अपेक्षित होते परंतु तसे न करता चौकशी समिती नेमून चौकशी सुरू केली आहे. पाच ते सहा लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा प्राथमिक अहवालात दिसून येत असून चौकशी अधिकारी,मुख्याधिकारी व सदर लिपिकाने या प्रकरणात तडजोड करून हे प्रकरण मिटवण्याच्या तयारीत असल्याचे समजले आहे.२०१९-२०, २०२१-२२ २०२३-२४ मध्येही पाणीपट्टी वसुलीत मोठ्या प्रमाणात अपहार झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे याबाबतही जिल्हाधिकारी यांनी योग्य चौकशी समिती नेमून या प्रकरणातील दोषींवर योग्य ती कारवाई करावी. जनतेने भरलेल्या पैशांवर चैन करणाऱ्या लिपिकाला योग्य ती शिक्षा करावी अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.गेल्या दोन वर्षांपासून नगरपालिकेवरती प्रशासकीय सत्ता असून सर्वसामान्यांना त्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी वारंवार हेलपाटे घालावे लागत असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top