वाहनांसह 730100/- सुगंधी माल मंगळवेढा पोलिसांनी केला जप्त
मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी, दि.14/12/2024- कर्नाटक राज्यातून मंगळवेढ्याकडे बेकायदा गुटखा सुगंधी पदार्थ घेणारे वाहने टाटा जेस्ट वाहन क्रमांक केए-13, सी-3861 हे पकडले आणि वाहनांसह एकूण 730100/- माल जप्त केला आहे.याबाबत उमेश सुभाष भुसे, वय-35 वर्षे सहायक आयुक्त यांचे कार्यालय अन्न व औषध प्रशासन सोलापूर यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
आरोपी समिर पैगंबर मुजावर उर्फ आरिफ इब्राहीम शेख, वय-20 वर्षे,रा.हायनाल,ता. चडचण, जि.विजापुर,सागर शरणप्पा आलकुंटे,वय-19 वर्षे,रा.हायनाल ता.चडचण, जि. विजापुर,सतिश शरणप्पा बनसोडे,वय 19 वर्षे,रा. डायनाळ, ता.चडचण, जि.विजापुर,मुबारक महबुब मुल्ला, वय- 24 वर्षे,रा.देवरनिबर्गी,ता.चडचण जि. विजापुर व फरार इसम महिबुब इब्राहिम शेख,वय-22 वर्षे,रा.चडचण,जि. विजापुर यांच्याविरुध्द तक्रार दिली आहे.

दि.13/12/2024 रोजी रात्री 10:45 वा. च्या सुमारास मौजे कात्राळ, ता.मंगळवेढा,जि. सोलापुर येथे बंदी घातलेली सुगंधी पदार्थ येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारा कडून मिळाली होती त्यानुसार सदर ठिकाणी सापळा लावण्यात आला होता.त्यावेळी गुन्ह्यातील वापरलेले वाहने टाटा जेस्ट वाहन क्रमांक केए-13, सी-3861 हे असून यात मिळालेला – मावा 2300 पाकिटे- 69000 प्रत्येकी कि. 30 रु प्रमाणे, सुगंधित तंबाखु 15 किलो 640 -9600, मावा बनवण्याची मशीन 1- 150000, मिक्सर 1-1500, टाटा जेस्ट वाहन क्रमांक KA13C3861 – रु.1,50000 असा एकूण 730100/- माल जप्त केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,दि. 14/12/2024 रोजी 10:45 वा.च्या सुमारास समिर पैगंबर मुजावर, उर्फ आरिफ इब्राहीम शेख,वय-20 वर्षे, रा.हायनाळ, ता.चडचण, जि.विजापुर,सागर शरणप्पा आलकुंटे,वय 19 वर्षे, रा. हायनाळ, ता.चडचण,जि. विजापुर,सतिश शरणप्पा बनसोडे, वय 19 वर्षे, रा.हायनाळ, ता.चडचण, जि.विजापुर, मुबारक महबुब मुल्ला, वय 24 वर्षे,रा. देवरनिबर्गी, ता. चडचण, जि.विजापुर यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जारी केलेल्या प्रतिबंधित गुटखा,पानमसाला, सुगंधित तंबाखू, मावा इत्यादी तत्सम अन्न पदार्थाचा विक्री हेतू उत्पादन, साठा, पुरवठा व वाहतुक करुन अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे व दि.12 जुलै 2024 चा भंग केला आहे. तसेच सदर आरोपींनी अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य या लोकसेवकाने, त्यांना दिलेल्या अधिकारा नुसार जनहित व जन आरोग्याच्या दृष्टिकोनातून काढलेल्या आदेशाची अवज्ञा केलेली असल्यामुळे वरील सर्व आरोपींविरुध्द कायदेशिर फिर्याद केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पो.स.ई. श्री धापटे हे करत आहेत.
