५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन अनवली येथे संपन्न
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/१२/२०२४- अनवली ता.पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सतू कृष्णा केणी विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे दि.१० व ११ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न झाले.

दि.१० डिसेंबर २०२४ रोजी रयत शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य राजेंद्र केदार व राज्य विज्ञान महामंडळाचे संचालक लक्ष्मीप्रसाद मोहिते यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी सदस्य औदुंबर डिसले हे होते.केंद्रप्रमुख मारुती काळुंगे व दिलीप पाटील, श्री.बरमदे सर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.डोईफोडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.


मुख्याध्यापक डोईफोडे यांनी प्रास्ताविक केले केले. राज्य विज्ञान महामंडळाचे संचालक लक्ष्मीप्रसाद मोहिते यांनी विज्ञान प्रदर्शनाचे महत्त्व आणि केव्हापासून सुरू करण्यात आले याची माहिती दिली.

यावेळी प्राथमिक विद्यार्थी गटातून १४०, माध्यमिक विद्यार्थी गटातून ११५,प्राथमिक शिक्षक गट ४, माध्यमिक शिक्षक गट ४, प्रयोगशाळा परिचर २ व दिव्यांग विद्यार्थी गटातून २ असे एकूण 267 प्रयोग तालुक्यातील स्पर्धकांनी आणले होते.

दि.११ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी पंचायत समितीचे केंद्रप्रमुख मारुती काळुंगे,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.डोईफोडे, राज्य विज्ञान महामंडळाचे संचालक लक्ष्मीप्रसाद मोहिते तसेच स्कूल कमिटीचे सदस्य औदुंबर डिसले व सर्व परीक्षक उपस्थित होते.

दोन दिवसाच्या या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपकरणांचे परीक्षण नरेंद्र भंडारकवठेकर सर,श्री आयाचित सर,जब्बार शिकलगार सर,श्रीमती गौरी अंमळनेरकर मॅडम,श्री नागणे सर या परीक्षकांनी अतिशय पारदर्शक पद्धतीने परीक्षण केले व यातून प्राथमिक विद्यार्थी गटातून तीन , माध्यमिक विद्यार्थी गटातून तीन, दिव्यांग विद्यार्थी गटातून एक, प्राथमिक शिक्षक गटातून एक ,माध्यमिक शिक्षक गटातून एक आणि प्रयोगशाळा परिचर गटातून एक असे एकूण दहा विज्ञान उपकरणे जिल्हास्तरासाठी पाठवण्यात आली.

या दहा उपकरणांची जिल्हास्तर निवड चाचणी जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होईल.हे प्रदर्शन नेटके नियोजनात पूर्ण करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.डोईफोडे व त्यांच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांनी प्रयत्न केले त्याबद्दल राज्य विज्ञान महामंडळाचे संचालक लक्ष्मीप्रसाद मोहिते यांनी या सर्वांचे आभार मानले.

पंढरपूर पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे यांच्या उपस्थित या प्रर्दशनाचे उद्घाटन आणि समारोप झाला.
