गोरगरिब जनतेला रेशन धान्य मिळण्यासाठी युवक काँग्रेस शहराध्यक्ष संदिप शिंदे आक्रमक
पंढरपूरच्या तहसिलदारांनी दिले आश्वासन
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर शहरातील व तालुक्यातील गोरगरिब सर्वसामान्यांना, अन्न सुरक्षेतील धान्य लोकांना मिळत नाही. याबाबत वारंवार तक्रार करून देखील सामान्य नागरिकांची दखल घेतली जात नाही.पंढरपूर शहारातील मोठ्या नामांकित लोकांना धान्य मिळते परंतु सर्वसामान्य अत्यंत गरीब लोकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.सातत्याने पाठपुरवठा करूनदेखील याची दखल घेतली जात नाही. या सर्व गोष्टींचा गांभिर्यपुर्वक विचार करावा आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी पंढरपूर शहर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदिप शिंदे यांच्या वतीने पंढरपूरचे तहसिलदार सचिन लंगुटे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष सोमनाथ आरे, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी, सेवा दल शहराध्यक्ष गणेश माने,युवक शहर उपाध्यक्ष रवि अग्रवाल, उपाध्यक्ष संग्राम मुळे,सोशल मिडीया शहराध्यक्ष महेश अधटराव,जिल्हा सरचिटणीस पांडुरंग डांगे, एकनाथ माने, किसान सेल तालुकाध्यक्ष अक्षय शेळके, वरिष्ठ उपाध्यक्ष आनंद सोमासे आदि उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की,ऑनलाईन रजिस्टर माल जादा असून प्रत्यक्षात लाभार्थीना माल कमी दिला जातो. कोणत्याही मशीनवर जाणूनबुजून धान्याची पावती दिली जात नाही.अन्न धान्य मोफत असतानासुध्दा लाभार्थींकडून पैसे घेतले जातात. या सर्व गोष्टींची दखल घेण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा युवक काँग्रेस शहर व तालुका तीव्र अंदोलन करेल असा इशारा शहराध्यक्ष संदिप शिंदे यांनी दिला.
पंढरपूरच्या तहसिलदारांनी दिले आश्वासन
ज्या नागरिकांचे नाव ऑनलाइन नाही ते करण्यात येईल. नागरिकांना शासनाकडून दिला जाणारा माल देण्यात येईल. धान्य देत नाहीत त्या रेशनधान्य दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पंढरपूरचे तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिले आहे.
