सोलापुर शहर महिला काँग्रेसच्यावतीने केक कापून तसेच शंभर गरजुंना चादर वाटप करून साजरा

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज – काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या श्रीमती सोनिया गांधी व प्रदेश कार्याध्यक्षा खा.प्रणितीताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुर शहर महिला काँग्रेसच्यावतीने केक कापून तसेच शंभर गरजुंना चादर वाटप करून साजरा करण्यात आला.

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९ डिसेंबर २०२४- अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या वाढदिवसनिमित्त सोलापुर शहर महिला काँग्रेसच्यावतीने काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष चेतन नरोटे, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

तसेच सिध्देश्वर मंदिर सिव्हिल चौक परिसरात शंभर गोरगरीब गरजु नागरिकांना चादर वाटप करण्यात आला.

यावेळी माजी महिला अध्यक्षा अँड करीमुनिसा बागवान , हेमाताई चिंचोळकर, वीणाताई देवकाते ,चंदा काळे, मुमताज तांबोळी, लता गुंडला ,शुभांगी लिंगराज, रेखा बिनेकर , रवीप्रभा लोंढे ,नीता बनसोडे, पूजा चव्हाण,छाया हिरवटे, मुमताज शेख,आश्विनी भोसले,विजयलक्ष्मी झाकणे,डॉ सुषमा गायकवाड,ज्योती गायकवाड,मीना गायकवाड,अनिता भालेराव,सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे,उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, सिद्धाराम चाकोते, बसवराज म्हेत्रे, अशोक कलशेट्टी ,हाजीमलंग नदाफ, दिनेश म्हेत्रे, लखन गायकवाड, शिवशंकर आजनाळकर ,नागेश म्हेत्रे ,नूरअहमद नालवार, दोडंप्पा तोरंणगी,राजेंद्र शिरकुल,दीनानाथ शेळके, तिरुपती परकीपडंला,पुरुषोत्तम श्रीगादी, शाम केंगार, संजय गायकवाड,सुभाष वाघमारे,चित्त वाडेकर,धीरज खंदारे , दत्तात्रय नामकर, नागनाथ शावणे,अभिलाष अच्युकटला आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
