लोकशाही वाचविण्यासाठी मारकडवाडीची लढाई, आम्ही त्यांच्या सोबत आहोत, आमचे मत जाणून घेण्याचा अधिकार, EVM बंद करून बँलेट वर निवडणुका घ्यावेत ही लोकांची भावना, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन उभा करणार, न्यायालयात सुद्धा दाद मागणार :- नाना पटोले
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांचा मारकडवाडी गाव दौरा

सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० डिसेंबर २०२४- EVM विरोधात आवाज उचलून बँलेट पेपर मतदान घेण्याची मागणी करणाऱ्या मारकडवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर गावचा दौरा संपन्न झाला यावेळी नाना पटोले यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले आणि या लोकशाही वाचविण्याच्या लढाईत आम्ही गावकऱ्यांसोबत आहोत असा विश्वास व्यक्त केला.

प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, सोलापूर शहर अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, माजी आमदार बंटी सपकाळ, रामहरी रुपनर, आदित्य फत्तेपुरकर, यशपाल भिंगे, तिरूपती परकीपंडला, शंकर नरोटे, गिरीधर थोरात, संजय गायकवाड, शिवशंकर अजनाळकर, गणेश वड्डेपल्ली, अप्पा सलगर, महेश वड्डेपल्ली यांच्यासह शहर जिल्ह्यातील पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
