पूरपरिस्थिती पुन्हा उद्भवू नये याकरिता यंत्रणांनी राहावे सतर्क:डॉ नीलम गोऱ्हे

नदीपात्र अतिक्रमणाची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल

पूरपरिस्थिती पुन्हा उद्भवू नये याकरिता यंत्रणांनी राहावे सतर्क: डॉ नीलम गोऱ्हे

मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९ नोव्हेंबर २०२४ : पुणे शहरामध्ये नदीपात्रामध्ये बांधकाम क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक राडारोडा टाकून नदीपात्रामध्ये अतिक्रमण करत असल्याचे निदर्शनास आले आहे.या संदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुणे पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्राधिकरण यांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना आज दिल्या.

शहरामध्ये मागील पूर परिस्थिती दरम्यान राज्याचे मुख्यमंत्र्यांसमवेत डॉ गोऱ्हे यांनी बाधित क्षेत्राची पाहणी केली होती. यामध्ये बऱ्याच नागरिकांचे स्थलांतरण करावे लागल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले होते. नदीपात्रातील अतिक्रमणामुळे पूरस्थिती निर्माण होऊ नये याकरिता सूचना देण्यात आल्या होत्या.त्याची गांभीर्याने दखल घेऊन सीसी टीव्ही सर्वेलंस,भरारी पथक,तपासणी नाके इत्यादी आवश्यक त्या उपाययोजना स्थानिक प्राधिकरणांनी कराव्यात अशा सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top