समाजसेवक मुजम्मील कमलीवाले भारत प्रतिभा सन्मान पुरस्काराने दिल्लीत सन्मानित
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर येथील समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना दिल्ली येथे भारत प्रतिभा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.तसेच त्यांना भारत प्रतिभा सन्मान ची सनद देण्यात आली आहे.भारतातून फक्त 10 जणांना हा सन्मान मिळाला आहे.

पंढरपूर येथील समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना NDMC कन्व्हेन्शन सेंटर संसद मार्ग नवी दिल्ली येथे भारत प्रतिभा सन्मान’ (सनद) पुरस्कार पद्मश्री डाॅ जितेंद्र सिंग षंटी यांच्या हस्ते देण्यात आला.
गरीब लोकांना अन्नदान,गरीब होतकरूंना शैक्षणिक सोयी सुविधा होत नसल्याने मुजम्मील कमलीवाले यांनी त्या उपेक्षितांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे काम केले आहे.
पुरस्कार मिळाल्यानंतर मुजम्मील कमलीवाले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले हा पुरस्कार माझा नसून समाज आणि समाजासाठी काम करणार्या लोकांचा आहे.
