Maharashtra Marathi Breaking News Live Today: विधानसभा निवडणूक मतदान 20 नोव्हेंबर रोजी पार पडले असून उद्या म्हणजे शनिवार 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार असून राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाले असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. याआधी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? राज्यात कोणाचे सरकार स्थापन होणार, महायुती की महाविकास आघाडी? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सविस्तर वाचा
डॉ. अश्विन फर्नांडिस यांनी लिहिलेले, हे पुस्तक पंतप्रधान मोदींच्या शासन तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकते आणि विकसित भारताच्या त्यांच्या दृष्टीवर लक्ष केंद्रित करते. सविस्तर वाचा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री अडीच वाजता दुचाकीवरून घरी जात असताना तरुण तलाठीचा भीषण अपघात झाला. सविस्तर वाचा
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी अनेक नेत्यांनी देवाकडे आशीर्वाद मागितले आहे. यादरम्यान शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक महायुतीच्या नेत्यांनी शुक्रवारी सकाळी तिरुमला श्री व्यंकटेश्वर मंदिरात पूजा केली. सविस्तर वाचा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता 24 तासांपेक्षा कमी वेळ उरला आहे. यापुर्वीच महाविकास आघाडीच्या गटात मुख्यमंत्र्यांबाबत गदारोळ सुरू झाला आहे. <a href="https://marathi.webdunia.com/article/maharashtra-assembly-election-2024/there-is-a-commotion-in-the-mahavikas-aghadi-group-regarding-the-chief-minister-124112200008_1.html"><strong>सविस्तर वाचा </strong></a>
झारखंड आणि महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पूर्णपणे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बाजूने असल्याचा दावा केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी केला. सविस्तर वाचा