Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates in Marathi: विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी असून महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते..
</p>
छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गा वर कारमध्ये 19 किलो सोने आणि 37 किलो चांदी सापडली
निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान, शुक्रवारी 'स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम' (SST) ने महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे एका वाहनातून 19 किलो सोने आणि 37 किलो चांदी जप्त केली, ज्याची एकूण किंमत सुमारे 19 कोटी रुपये आहे. सिल्लोड शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने जप्त केलेले मौल्यवान धातू वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाकडे सुपूर्द केले आहेत.
निष्क्रिय आमदाराला घरचा रस्ता दाखवा, हडपसर येथे शरद पवार यांचे वक्तव्य
हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांच्या प्रचारार्थ माळवाडी, हडपसरमध्ये आयोजित जाहीर सभेत शरद पवार यांनी निष्क्रिय आमदाराला घरचा रस्ता दाखवा असे वक्तव्य दिले
पावसातही कोल्हापुरात शरद पवार यांनी सभेला संबोधित केले, व्हिडिओ व्हायरल!
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे.
#WATCH | NCP-SCP chief Sharad Pawar delivered his speech in the rain, in Ichalkaranji, earlier today
(Source: Social Media page of Sharad Pawar)#MaharahstraElection2024 pic.twitter.com/pZZRypRReR
— ANI (@ANI) November 15, 2024
दरम्यान, शरद पवार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत
असून, त्यात ते पावसात भिजत भाषण करताना दिसत आहेत
महाराष्ट्र चुकीच्या हातात गेला असून, त्याची अवस्था बिकट झाली, शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल
Sharad Pawar News : गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र चुकीच्या हातात गेला असून, त्याची अवस्था बिकट झाली आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केला. पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या समर्थनार्थ प्रचारासाठी ते पुणे जिल्ह्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघात होते.
महायुतीला बहुमत मिळाले तर मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी दिले उत्तर
Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी गुरुवारी मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्र निवडणुकीसाठी 2024 साठी शेवटची सभा घेतली.निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीतील फूटही स्पष्टपणे दिसून आली. काल मुंबईत पंतप्रधान मोदींच्या सभेत राष्ट्रवादीचा एकही नेता दिसला नाही.
महाविकास आघाडी महाराष्ट्रात 165 ते 170 पेक्षा जास्त जागा जिंकेल
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी व्यक्त केला. यासोबतच महाविकास आघाडी महाराष्ट्रात 165 ते 170 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा अंदाज त्यांनी शनिवारी व्यक्त केला.