प्रसिध्द गायक संगीतकार अजय गोगावले यांनी घेतले श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.09- प्रसिध्द गायक अजय गोगावले यांनी दि.09 नोव्हेंबर रोजी सायंकाळी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले.त्यावेळी त्यांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यथोचित सन्मान केला.

यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
