बिडी उद्योग बंद पाडण्याचे भाजपचे षडयंत्र :- चेतन नरोटे
सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज –२४९, सोलापूर शहर मध्य विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ पूर्व विभागात अनेक ठिकाणी बैठका संपन्न झाल्या.

यावेळी बोलताना चेतन नरोटे म्हणाले की, भाजपने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावाखाली येऊन धूम्रपान कायदा आणला होता केवळ प्रणितीताई शिंदे यांच्या आंदोलनामुळे बिडी उद्योग सुरू राहिला.बिडी उद्योग बंद करण्याचे भाजपचा षडयंत्र लपून राहिलेला नाही. म्हणून या विधानसभा निवडणुकीत महिलांच्या रोजगारावर गदा आणणाऱ्या महिला विरोधी भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाला बहुमताने विजयी करा.

यावेळी काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
