जम्मू-काश्मीर मध्ये दोन ग्रामरक्षक ठार, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच



Jammu Kashmir News : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात दहशतवाद्यांनी दोन ग्रामरक्षकांचे अपहरण करून त्यांची हत्या केली. तसेच सोपोरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांसोबत त्यांची चकमक सुरू झाली. ही चकमक अजूनही सुरू आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, उत्तर काश्मीरमधील सोपोर भागात सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी अभियान सुरू केल्यानंतर भीषण चकमक सुरू झाली आहे. दोन ते तीन दहशतवादी जाळ्यात अडकल्याचा अंदाज आहे.

 

तर बारामुल्लाच्या पानीपुरामध्येही दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. गुरुवारी, दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दलच्या विशिष्ट गुप्तचरांच्या आधारे, लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोपोरच्या पानीपुरामध्ये संयुक्त कारवाई सुरू केली. सतर्क जवानांना संशयास्पद हालचाली दिसल्या आणि त्यांना आव्हान दिल्यावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. जवानांनी प्रभावीपणे प्रत्युत्तर दिल्याचे लष्कराने सांगितले. ही कारवाई अजूनही सुरू आहे.किश्तवाड हत्याकांडावर लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा म्हणाले की, आम्ही सर्व दहशतवादी संघटना नष्ट करण्याचा करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

 

Edited By- Dhanashri Naik 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top