मराठी रंगभूमी दिन, पु. ल. देशपांडे यांची जयंती दिनी 26 व्या स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य उद्घाटन 5 नोव्हेंबर रोजी


swar sagar mahosav

social media

मराठी रंगभूमीदिन व पु.ल. देशपांडे यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन वतीने 26 व्या स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य उद्घाटन मंगळवारी 5 नोव्हेंबर रोजी ग. दि. माडगूळकर सभागृहात होणार आहे. 

हा सोहळा संध्याकाळी 6 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती मुख्य संयोजक प्रवीण तुपे व सहसंयोजक राजीव तांबे यांनी दिली आहे. 

स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य उद्घाटना नंतर सोमवारी 4 नोव्हेम्बर रोजी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क तारांगण सभागृहात मराठी भाषेला अभिजात दर्जा पुढे काय? या सत्राचे आयोजन संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. पं. व्यंकटेश कुमार यांचे गायन, श्रद्धा शिंदे – हर्डीकर यांचा कथक नृत्याविष्कार होणार आहे. 

बुधवारी संध्याकाळी 6 वाजता स्नेहल सोमण यांचे सामूहिक  नृत्यरंग, डॉ. शर्वरी डीग्रजकर – पोफळे यांचे शास्त्रीय गायन, स्वरस्वप्न – व्हायोलिन समूह वादनचा कार्यक्रम होणार आहे. तर या सोहळ्याचा समारोप गुरुवारी 7 नोव्हेंबर रोजी सांयकाळी 6 वाजेच्या सुमारास पु.ल. देशपांडे यांनी लिहलेले सखाराम बाईंडर या नाटकाचे मंगेश सातपुते यांनी दिग्दर्शित केलेले ‘मॅड सखाराम’ हे विडंबन नाट्य सादर होईल.

 

डॉ. सुमेधा गाडेकर यांची ‘महाराष्ट्राची संत परंपरा’ ही नृत्यनाटिका, मिलिंद ओक व राहुल सोलापूरकर यांचा निशे प्रस्तुत ‘ब्लॅक अँड व्हाईट’ या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाने स्वरसागर महोत्सवाची सांगता होणार.

Edited By – Priya Dixit 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top