मंदिरात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे भीषण अपघात, 150 पेक्षा अधिक जण जखमी



केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील नीलेश्वरमजवळील एका मंदिरात उत्सवादरम्यान फटाक्यांच्या आतषबाजीमुळे झालेल्या दुर्घटनेत 150 हून अधिक लोक जखमी झाले असून त्यात आठ जण गंभीर आहे.  

 

मिळालेल्या माहितीनुसारअपघातानंतर जखमींना कासारगोड, कन्नूर आणि मंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील नीलेश्वरजवळील मंदिरात फटाक्यांची आतषबाजी करताना भीषण अपघात झाला असून सोमवारी रात्री उशिरा झालेल्या या अपघातात दीडशेहून अधिक जण जखमी झाले आहे. जखमींपैकी 8 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.   

वीरकावू मंदिराजवळील फटाक्यांच्या साठ्याला आग लागल्याने हा दुर्दैवी अपघात झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top